१ लाखांची लाच स्वीकारताना विमानतळ पोलीस ठाण्यातील एपीआयला एसीबीने केली अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ( API) व त्याच्या साथीदाराला १ लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची बातमी वार्‍यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात एका २२ वर्षीय तरूणाने तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार पळताडणी करून आज ८ सप्टेंबर रोजी सापळा लावण्यात आले होता.

तक्रारदाराच्या वडीलांवर विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्हयामध्ये जामीन मिळण्यास मदत होईल यासाठी तपासात आवश्यक ती मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील वय ३३ वर्षे तक्रारदाराकडून ५ लाखांची लाचेची मागणी करून केली होती.

तडजोडीअंती ३ लाख रूपये लाचेची मागणी केली त्यास एपीआय पाटील व संतोष भाऊराव खांदवे वय ४५ वर्षे रा. लोहगाव या खाजगी इसमाला १ लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्या दोघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर हे करत आहेत.

Advertisement
Share Now