वाळूने भरलेला ट्रक सरकारी जॅमर सहित गेला चोरीला,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement
संग्रहित फोटो

अज्ञात चोरट्यांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : हडपसर येथील सार्वजनिक रस्त्याच्या बाजुला कृष्णा वडेवाले हॉटेल समोर लावलेला वाळूचा

ट्रक अज्ञात चोरट्यांने चोरून नेलयाचा प्रकार घडला आहे. अवैध खनिज वाळूचा ट्रक धरून हडपसर पोलिसांनी कृष्णा वडेवाले

हॉटेल समोर पार्क करून त्याला सरकारी जॅमर व साखळी लावून लॉक करण्यात आले होते. त्या लाल रंगाच्या ट्रक नं.एम.एच – ४२-

टि ९५७२ ट्रक मध्ये ७० हजार रूपयांचे ३.५ ब्रास अवैध्य गौण खनिज वाळू होती. वाळू आणि ट्रक असे मिळून २ लाख २३ हजार

ऐवजासह चोरी करुन नेला आहे. या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शोभा क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाणे करित आहे.

Advertisement
Share Now