पुण्यातील वकिलाच्या खून प्रकरणात नविन वळन,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Murder case of a lawyer) वकिलांच्या संघटनेतील सचिवाला अटक

(Murder case of a lawyer) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

a-new-twist-in-the-murder-case-of-a-lawyer-in-pune
संग्रहित फोटो

पुणे शहरातील शिवाजी नगर न्यायालयातील परिसरातून गायब झालेल्या उमेश मोरे या वकिलाचा मृतदेह तामिनी घाटात सापडल्याने खळबळ उडाली होती.

त्यात काही वकिलांचाच सहभाग निघाल्याने वकिलांची संघटना आश्चर्यचकित झाली आहे.

पोलिसांचा तपासात गती आल्याने बरेच धागेदोरे आवढण्याचा काम पोलीस करत होते.

त्यात पुणे बार असोसिएशनच्या सचिवाला अटक करण्यात आल्याने एका प्रकारे खळबळ उडाली आहे. सचिव ऍड घनश्याम पोपट दराडे यांना अटक केली आहे.

मोरे यांचे २ ऑक्टोबरला न्यायालयाच्या परिसरातून अपहरण झाले होते. यानंतर त्यांचा शोध घेतला जात होता.

व पुणे बार असोसिएशनच्या वकिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्वरित आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली होती.

वाचा : दिपक मारटकर खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधारास अटक

१५ दिवसांनी पोलिसांनी प्रकार उघडकीस आणत वकील रोहित शेंडे याच्यासह कपिल विलास फलके,

दीपक शिवाजी वांडेकर यांना अटक केली होती. जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती .

एका फिल्म कथेनुसार हा खून झाला होता. यानंतर या आरोपींकडे चौकशी सुरू होती.

त्यात आता थेट असोसिएशनच्या सचिवाचे नाव समोर आले आहे. दराडे यांना न्यायालयात हजर केले असता ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वाचा : गोवंश हत्याबंदी कायद्याच्या दुरुपयोगाबाबत हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

Advertisement
Share Now