पुण्यातुन तडीपार असताना ही पुण्यात येवुन दहशत माजवणारा सराईत जेरबंद

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

Tadipaar from Pune :तडीपार सुरज उर्फ धनंजय नारायण अडागळे जेरबंद

Timepass-in-electoral-work-brings-crime-to-two-hundred-teachers

Tadipaar from Pune : पोलीस न्यूज 24 : लॉकडाऊन मुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असताना गुंडांना मात्र उत आले आहे .

लॉकडाऊन मुळे नागरिकांचे जीव मेटाकुटीला आले असून या गुंडांनमुळे त्या त्रासात आणखीन भर पडली आहे .

अश्या गुंडांना त्यांची जागा दाखविण्याचे काम काही पोलीस अधिकारी व कर्मचारी जोमात करत आहे .

कचरा करतोय भंगारवाला आणि उचलतोय मनपावाला

13 ऑगस्ट रोजी युनिट 1, गुन्हे शाखा यांचेकडील अधिकारी व कर्मचारी हे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना ,

पोलीस नाईक अमोल पवार यांना बातमी मिळाली कि सध्या तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार हा नवरत्न हॉटेल जवळील बोळात तावरे कॉलोनी रोडवर उभा आहे ,

सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सुरज उर्फ धनंजय नारायण अडागळे (वय 19 वर्ष रा.महात्मा गांधी सोसायटी,पदमावती,सहकारनगर पुणे )

असल्याचे सांगितले त्याच्या विरुद्ध महा .पो.का.क.142 अन्वये फिर्याद देवून त्यास पुढील कारवाई साठी दत्तवाडी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

आलिशान मोटारीतून दारू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक, २ लांखाची दारू जप्त,

सदरील आरोपीवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

  1. सहकारनगर पोलीस स्टेशन गुरनं 412/2019 भादवि कलम 354(ड)323,504,506,507,352,141,143,144,147,पास्को क 11,12
  2. सहकारनगर पोलीस स्टेशन गुरनं 425/2019 आर्म ॲक्ट 4(25)
  3. स्वारगेट पोलीस स्टेशन गुरनं 270/2019 आर्म ॲक्ट 3(25), 4(25)
  4. स्वारगेट पोलीस स्टेशन गुरनं 463/2018 भादवि कलम 326,323,504,427,143,144,146,147
  5. सहकारनगर पोलीस स्टेशन गुरनं 380/2017 भादवि कलम 143,144,146,147 क्री.लॉ.ॲ.का.क.7

सदरची कामगिरी पोलिस उप निरीक्षक हनुमंत शिंदे,अमोल पवार,वैभव स्वामी,अनिल घाडगे , तुषार माळवदकर,अजय थोरात, बाबा चव्हाण यांनी केली आहे.

Advertisement
Share Now

One thought on “पुण्यातुन तडीपार असताना ही पुण्यात येवुन दहशत माजवणारा सराईत जेरबंद

Comments are closed.