पुष्ठा गोळा करीत असल्याचा राग मनात धरून एकावर जीव घेणा हल्ला,
शिवीगाळ व लाथा-बुक्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुष्ठे गोळा करीत असल्याचा मनात राग धरुन एकाला शिवीगाळ करून लाथा-बुक्यांनी मारहाण करुन,
जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश चौधरी वय-३२,
वर्ष, रा. खांदवेनगर ,लोहगांव,पुणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अशोक काळुराम ताठे,वय-५० वर्ष, रा. खांदवेनगर,
लोहगांव यांना अटक करण्यात आली आहे.खांदवेनगर मिल्ट्री टॉवर जवळ असलेल्या म्हशीच्या गोठया जवळ फिर्यादी व आरोपी हे,
एकाच वस्तीत राहण्यास असुन,ते एकमेकांचे परीचयाचे आहेत. आरोपी अशोक ताठे हा कंपनी मध्ये काम करत असुन,
फिर्यादी चौधरी हे फिरुन कागदी पुष्ठे जमा करण्याचे काम करतात. फिर्यादी हे नमुद ठिकाणी उभे असताना कामठे याने दारु पिवुन,
फिर्यादी यांचे जवळ येवुन,फिर्यादी हे कामठे काम करीत असलेल्या कंपनी मध्ये असलेले पुष्ठे गोळा करीत असल्याचे कारणावरून,
त्याचा राग मनात धरून चौधरी यांना शिवीगाळ व लाथा-बुक्यांनी मारहाण करुन, फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच,
जवळील लोखंडी धारदार चाकुने चौधरी यांचे गळयावर, पोटावर, बेंबीजवळ उजव्या हाताचे बोटावर मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील तपास लहाने करीत आहे.