पत्ते खेळताना हाटकल्याने महिलेच्या घरात घुसून हल्ला, लहान मुलगी जखमी.
वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : किरकोळ किरकोळ कारणावरून हत्यारे काढून पार घरात घुसून हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत. असाच एक प्रकार पुण्यातील रामटेकडी येथे घडला आहे.
महिलांच्या स्वच्छतागृहाजवळ पत्ते खेळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आणि त्याच्या मित्रांना हाटकल्यावर चौघांनी घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
यात ७ वर्षाची लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. रामटेकडीत हा प्रकार घडला आहे.
करण सुंदरलाल वाल्मिकी रा. रामटेकडी, पापा वाघेला आणि साहिल उर्फ लडु वाघेला या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.
तर रफिक शेख हा आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूरज पाटोळे यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे कुटुंबासह रामटेकडी येथील मगरीनभाईची चाळ येथे राहण्यास आहेत. दरम्यान आरोपी करणं वाल्मिकी हा सराईत गुन्हेगार आहे.
तो आणि त्याच्यासोबत आरोपी हे येथील महिलांच्या सार्वजनिक शौच्छालयाजवळ पत्ते खेळत बसले होते. यावेळी सूरज पाटोळे हे याठिकाणी महिला येतात, इथे पत्ते खेळू नका असे म्हणत त्यांना हटकले. याचा राग आरोपींच्या मनात आला होता.
यावेळी आरोपी हे हातात तीक्ष्ण हत्यारे घेऊन फिर्यादी यांच्या घरात घुसले. तसेच त्यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावर फिर्यादी व त्यांची मूलगी घरीच होती.
फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांनी सपासप वार केले. यावेळी ७ वर्षाची लहान मुलगी मध्ये आली.
आरोपींकडून तिच्या देखील गालावर वार झाला. यात तिचा गाल फाटला आहे. फिर्यादी यांचे पती व त्यांची ७ वर्षाची मुलगी यात गंभीर जखमी झाली आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फरार झालेल्या तिघांना अटक केली. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.