काहि तासापुर्वी मोकका दाखल झालेल्या महिलेने ससून रूग्णालयात केली आत्महत्या,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Sassoon hospital)पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर उडाली खळबळ.

(Sassoon hospital) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

पुणे शहर पोलीस आयुक्तांनी काही तासांपुर्वी मोकका गुन्ह्यात अटक केलेली आरोपी

दिप्ती काळे याने ससून रुग्णालयाच्या ८ व्या मजल्यावररुन उडी मारत आत्महत्या केल्याने मोठ्ठी खळबळ उडाली आहे.

मात्र ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पडली असावी असा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे.

परंतु या आत्महत्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या आत्महत्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,

दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांच्यावर सराफ व्यवसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आले होते.

वाचा : धमक्या देऊन खंडणी उकळणाऱ्या टोळीवर “मोक्का” नुसार कारवाई,

तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ती पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

तर कालच तिच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराचा

गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाखोंची जागा नावावर करुन घेत आणखीन जागा नावावर करण्यासाठी धमकावत होते,

अशी तक्रार प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल केला होता.

आणि आजच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या टोळीवर मोक्काची कारवाई केली होती.

या टोळीची प्रमुख दीप्ती काळे ही होती.दरम्यान ससून रुग्णालयाच्या बाथरूम मधून दिपतीने उडी मारली असल्याचे सांगितले जात आहे.

वाचा : कयामत आनेवाली है… रमजानुल मुबारक – १५

Advertisement
Share Now