कोंढव्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेलवर गुन्हा दाखल,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

कोंढवा पोलीसांनी केली मध्यरात्री कारवाई.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सगळे नियम धाब्यावर बसवत रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्या प्रकरणी कोंढव्यातील एन आय बी एम (NIBM) येथील एका हॉटेचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने शहरात रात्री संचारबंदी लागू केली आहे.

हॉटेल, रेस्ट्रारंटला रात्री ११ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. परंतु अनेक हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांनी आता हॉटेलचालका सोबतच उशिरापर्यंत हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या ग्राहकांवरही गुन्हा दाखल करण्यात सुरुवात केली आहे.

कोंढव्यात मध्यरात्रीपर्यंत सुरु असलेल्या ” बेहेस्त ” या रेस्टॉरंटवर कोंढवा पोलिसांनी कारवाई करुन हॉटेलचालकासह ११ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

त्यात ४ ग्राहकांचा समावेश आहे. ग्राहकांवरही गुन्हे दाखल होत असल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement
Share Now