तुझे मै अभि जिंदा नही छोडुंगा असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

हडपसर सय्यदनगर येथील प्रकार.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पत्नीला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती विरोधात ३०७ कलमा

अंतर्गत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हकीकत अशी की हडपसर सय्यदनगर येथील गल्ली १२

अ समोर अजमुद्दीन मकबुल पठाण वय ४५ वर्षे रा.जावेद वॉशिंग सेंटरचे समोर, गल्ली नंबर १२ जवळ, सय्यदनगर हडपसर,

पठाण यांनी १ जुलै रोजी ४ वाजण्याच्या दरम्यान अजमुद्दीन मकबुल पठाण हे पत्नीला घरातून निघून जा माझे घर खाली कर

असे म्हणुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचा दोन्ही हाताने जोरात गळा दाबुन तुझे मै अभि जिंदा नही छोडुंगा

असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अजमुद्दीन

मकबुल पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिवळे करत आहेत.

Advertisement
Share Now