पाठीमागून येणाऱ्या बुलेटचा धक्का लागला म्हणून तरूणाला मारहाण,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

कोंढवा पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पाठिमागून येणाऱ्या बुलेट दुचाकीचा फक्त धक्का लागला म्हणून तरूणाला ४ जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याचे प्रकार कोंढवा येथे घडला आहे.

त्या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात परवेज पठाण,वय-२५ वर्षे,रा.देहु रोड,पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता जे.के.पार्क येथील आर.के.चिकन दुकाना जवळील सार्वजनिक रोडवर फिर्यादी पठाण हे बुलेटवरुन घरी जात असताना त्यांना मोटार सायकल आडवी आल्याने पठाण यांच्या बुलेटचा धक्का समोरील मोटार सायकलच्या फुटरेस्टला लागल्यानतंर दोन अनोळखी इसमापैकी मागे बसलेल्या अनोळखी इसमाने त्यांचे हातातील धारदार हत्याराने पठाण यांच्यावक्ष वार करीत असताना पठाण यांनी

त्यांचा उजवाहात मध्ये घातला असता त्याचा वार हा डावे हातावर लागल्याने पठाण यांच्या हातातुन रक्त येऊ लागल्याने फिर्यादी हे खाली बसले असता पुन्हा धारदार हत्याराने पाठीवर वार केल्याने,

फिर्यादी हे खाली जमीनीवर झोपले असता मारहाण करून पळून गेले आहे.

संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील करत आहेत.

Advertisement
Share Now