आमच्या विरुध्द दाखल केलेला गुन्हा माघारी घे असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथा-बुक्यांनी मारहाण,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Hadapsar police station) हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

(Hadapsar police station) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

दाखल केलेला गुन्हा माघार घेण्यासाठी एकाला हडपसर येथे मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी राजु माने,वय-५३ वर्ष,रा.स.न.२०४,पापडे वस्ती फुरसुंगी पुणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून डब्ल्युसिंग पंजाबसिंग टाक, वय-३१ रा.महात्मा फुले वसाहत व त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

वाचा : जीवनाचा सर्वनाश – दारू : रमजानुल मुबारक – १३

२५ एप्रिल रोजी प्रगती शाळे समोर काळेपडळ येथील सचिन काळे यांचे गोठयाच्या पाठीमागील बाजुस झाडाखाली ,

फिर्यादी माने हे झाडाखाली बसले असताना आरोपी टाक याने रिक्षाने येवुन तुझ्या मुलाने आमचेविरुध्द दिलेला गुन्हा माघारी घे असे म्हणुन माने यांना शिवीगाळ करुन त्यांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली.

तसेच जीवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी कोयत्याने त्यांचे डोक्यात कानावरती वार करून त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.

वाचा : पुण्यात खळबळजनक प्रकार; गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल,

Advertisement
Share Now