कोंढवा मिनी पाकिस्तान आहे म्हणाऱ्या मिलिंद एकबोटेवर गुन्हा दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

संभाजी ब्रिगेडने दाखल केला गुन्हा.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोंढवा मिनी पाकिस्तान आहे व अतिरेक्यांचा सिलिपर सेल आहे

असे वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १५३,१५३अ, ब” २९५अ, २९८,५००,५०१,५०२, व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांच्या तक्रारीनुसार जाणीवपूर्वक बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने व हेतूने लोकांना जमविले.

तसेच त्या ठिकाणी कोंढव्याबाबत वक्तव्य करून पुणेकरांची सुरक्षा धोक्यात आली आहे. असा निर्णय पालिकेने घेतला आहे असे बेताल वक्तव्य केले.

तर एका समाजाबाबतही वक्तव्य केले असून, त्याचे चित्रीकरण करत ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. तसेच एक आक्षेपार्ह पत्र पुणे महापालिकेला दिले आहे.

महापुरुषांच्या नावाची बदनामी केली असल्याचे काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Advertisement
Share Now