पुणे आरटीओची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

फ्रि लॅन्डर कारचे हस्तांतर प्रकरण भोवले.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (RTO) एका महिलेने फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने त्या महिले विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अस्लम शेख,वय-५० वर्षे,रा.महमदवाडी रोड,हडपसर पुणे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

२२ जानेवारी २०२० रोजी प्रादेशिक परीवहन कार्यालयात सदरील घटना घडली आहे.

सदरील महिलेने फ्रि लॅन्डर या कारचे हस्तातंर करताना सदर वाहनाचे मुळ मालक हे दि.१८ जानेवारी२०२० रोजी मयत झालेले

असताना सदरची बाब ही जाणुन-बुजुन लपवुन ठेवून ते मयत झालेचे न सांगता कारचे हस्तांतरा बाबत प्रादेशिक परीवहन

कार्यालयाकडील फॉर्म‌नं.२९/ ३० हा भरून,त्यावर २१ जानेवारी २०२० हि तारीख टाकुन सदरचे वाहन हे स्वतःचे नावे करून घेतल्याचे निर्दशनास आले आहे.

त्यावरून प्रादेशिक परीवहन कार्यालयाची दिशाभुल करून फसवणूक केली असल्याने ४२० कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी करीत आहेत.

Advertisement
Share Now