खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई,
लोहियानगर गंज पेठेत कारवाई- लाखोंचा मुद्देमाल हस्तगत.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : शासनाने गुटख्यावर बंदी घातली असतानाही गुटखा विक्री सुरू असल्याने खडक पोलिसांच्या हद्दीतील गुटखा विक्रेत्यावर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
काल २८ जानेवारी रोजी पुणे शहरात विशेष कोबिंग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली होती.सदर कॉबिंग ऑपरेशन दरम्यान,अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडील,
पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, लक्ष्मण ढेंगळे हे प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ गुटखा विक्री करणारे इसमांबाबात माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळालेल्या
माहिती वरुन इसम समीर जमीर शेख, वय-४५ वर्षे, रा. ५४ एच,
पी २३६ म्हसोबा मंदिराजवळ लोहियानगर गंजपेठ पुणे याने त्याचे ५४ एपी /२४० लोहियानगर शिवराज मित्रमंडळा समोर लोहियानगर गंजपेठ पुणे येथील या ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ,
रॉयल ७१७ तंबाखु, विमल पान मसाला, व्हि-१,आर एम डी,नजर ९ हजार गुटखा, हिरा पान मसाला विन, ब्लॅक, सिगारेट हे विक्रि करण्यासाठी ठेवलेले असताना मिळुन आल्याने त्याठिकाणी छापा टाकून ६ लाख ५७ हजार ६६२ रुपयांचा तंबाख़ुजन्य पदार्थ जप्त करण्यात आला.
समीर जमीर शेख यांच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई ही अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहा पोलीस आयुक्त गुन्हे १ सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार प्रविण शिर्के,
सुजित वाडेकर, संदिप जाधव, राहुल जोशी, विशाल शिंदे, मारुती पारधी, रुबी अब्राहम,रेहना शेख, प्रविण उत्तेकर, मनोज साळुंके, नितीन जाधव, रमेश पवार संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली आहे.