कोंढवा परिसरामध्ये ताबे मारून खंडणी मागणाऱ्या इनामदार टोळीविरुध्द ९१ लाखाची खंडणी मागितलेवरुन गुन्हा दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Inamdar gang) मुसा इनामदाराला पोलीसांनी केली अटक.

(Inamdar gang) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

कोंढवा परिसरात जमिनीचे ताबे मारून खंडणी मागणाऱ्या विरोधात खंडणी विरोधी पथाकाने कारवाई केली आहे.

तक्रारदार यांनी त्यांची व त्यांच्या मित्राची कोंढवा परिसरामध्ये असलेली एकूण ९१ गुंठे जागेवर पापा नबी इनामदार ,

मुसा कमरुद्दीन इनामदार,रुपचंद भिमाजी गजरे, रफीक इनामदार,

अयाज अब्दुल रेहमान शेख सर्व रा.कोंढवा यांनी ताबा मारून बोर्ड लावून ताबा सोडण्यासाठी तसेच सर्व सेटल करून देण्यासाठी

प्रतिगुंठा १ लाख अशी ९१ लाख रुपयांची खंडणी मागितले बाबत तसेच कोंढवा येवलेवाडी परिसरामध्ये अनेक ठिकाणी ताबे मारून

जुना नकाशा व नवीन नकाशा असा घोळ दाखवून अनेक लोकांकडून स्वस्तामध्ये जमीनी बळकावले जात असलेबाबत तक्रारी अर्ज दाखल केलेला होता

अपर पोलीस आयुक्त गुन्हे,पोलीस उपआयुक्त ,गुन्हे व सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे यांचेे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे

यांचे खंडणी विरोधी पथक-२ कडून सदर तक्रारी अर्जाचे चौकशीअंती पापा इनामदार टोळीवर कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : कोंढवा खुर्द येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.

तर आरोपी मुसा कमरुद्दीन इनामदार वय-४० रा.इनामदार वाडा, भैरवनाथ मंदिरामागे कोंढवा याला अटक करण्यात आलेली आहे.

तर इतर आरोपीचा शोध सुरु आहे.यामध्ये आणखी कोण कोण साथीदार आहे. याचा तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)अशोक मोराळे,पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे,

सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-२ लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड,

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर,

विनोद साळूके, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, अमोल पिलाने, भूषण शेलार,

प्रदिप गाडे, मोहन येलपल्ले, प्रविण पडवळ, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर,

आशा कोळेकर, खंडणी विरोधी पथक- २, गुन्हे शाखा यांनी केलेली आहे.

वाचा :कोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,

Advertisement
Share Now