५० लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या खाजगी इसमावर गुन्हा दाखल.

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने( ANTI CORRUPTION BUREAU PUNE) आज एका खाजगी इसमाला ५० लाख रुपयांची लाच प्रकरणी अटक केली आहे.

यासंदर्भात एकाने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या मित्राच्या सर्व्हे नंबर ४४४/१/१/१/१ या जमिनीच्या ७/१२ मधील

नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबतच्या सुनावणीचा निकाल तहसीलदार पिंपरी – चिंववड पुणे यांचेकडून तक्रारदार यांचे मित्राचे

बाजूने निकाल लावून देण्यासाठी खाजगी इसम दिलीप दंडवते रा.साई पार्क, दिघी पुणे याने तहसीलदार पिंपरी चिंचवड यांचेसाठी

५० लाख रूपयांची लाचेची मागणी केली.

त्याची खातरजमा करून दंडवते याच्या विरोधात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Advertisement
Share Now