पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : प्रेमविवाहानंतर दोन ते तीन महिलांशी अनैतिक संबंध ठेवून मारहाण करुन तीन मुलांना घेऊन जाऊन जाणा-या पोलीस पतीबा विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे‌.

राजकुमार तात्याबा शिंदे वय ४२, रा. हडपसर असे गुन्हा दाखल
झालेल्या पोलीस नाईक याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पत्नीचे व राजकुमार शिंदे यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. त्यावेळी त्याने फिर्यादीच्या संमतीविना जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. लग्नानंतरही शिंदे यांचे बाहेरील दोन ते तीन महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले.

त्याची विचारपूस केल्यावर शिंदे याने पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर शिंदे याने राहत्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य तसेच दोन मुली व लहान मुलगा यांना घेऊन कोठेतरी निघून गेले.

पत्नीला एकटे सोडून दिले. फिर्यादी याने आरोपीला वारंवार फोन केला तरी त्याने उचलला नाही. त्यामुळे मानसिक तणावात फिर्यादी यांनी स्वारगेट पोलीस वसाहतीतील राहत्या घरी २१ सप्टेंबर रोजी घरातील फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सध्या फिर्यादी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के
तपास करीत आहेत.

Advertisement
Share Now