३७ किलो गांजा जप्त : गुन्हे शाखेने केली मोठी कारवाई,

गांजाची वाहतुक करणारे दोघेजण जेरबंद.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरामध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
यासाठी पुणे शहर पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, फरारी, पाहीजे व तडीपार असलेले गुन्हेगार यांच्यावर नजर ठेवली जात आहे.
तसेच अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत.
गुन्हे शाखा युनिट १, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळालेल्या माहीतीवरुन,
पोलीसांनी कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या गेटजवळ विमाननगर याठिकाणी छापा टाकुन संशयीतरित्या मिळुन आलेली टाटा इंडिगो कार नंबर एमएच१२.डीई.७४८३ ताब्यात घेतली.
चालक रविंद्र योसेफ आढाव वय २३ रा. चांदा दत्तमंदीर समोर ता.नेवासा जिल्हा अहमदनगर व गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे वय ४१ यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडील कारची पाहणी केली असता कारमध्ये दोन पॉलीथीनच्या गोणीमध्ये एकुण ३७ किलो २०० ग्रॅम गांजा मिळुन
आला.
त्याची किंमत ९ लाख ५० हजार आहे. संशयीत गांजाची वाहतुक करण्यासाठी वापरत असलेली कार पोलीसांनी पकडु नये
व कोणी संशय घेवु नये म्हणुन,
त्यांनी कारच्या पुढील व पाठीमागच्या बाजुस काचेवर इंग्रजीत प्रेस (PRESS) असे स्टिकर लावलेले आढळुन आलेले आहे.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उप आयुक्त, गुन्हे बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त सुरेन्द्र देशमुख यांच्या मार्गदशनाखाली युनिट १ गुन्हे शाखा,
पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, युनिट-१ गुन्हे कडील पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, हनुमंत शिंदे,
पोलीस अंमलदार सचिन जाधव, इम्रान शेख, प्रशांत गायकवाड, महेश बामगुडे, अय्याज दडडीकर, तुषार माळवदकर, यांनी केली आहे.