पुणे महानगरपालिकेचे ड्रेनेजवरील लोखंडी झाकणे चोरी करणारे ३ आरोपींना अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे महानगर पालिकेकडून लाखो रुपये खर्च करून ड्रेनेजवरील लोखंडी झाकणे बसविले जाते तर ते झाकणे चोरी जात असल्याचे समोर आले आहे. ( Pune corporation)

२० ऑगस्ट रोजी कल्याणीनगर परिसरात पुणे महानगरपालिकेने ड्रेनेजवर बसविलेली लोखंडी जाळी असलेले पावसाळी चेम्बर्स वरील झाकणे कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केले म्हणून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( Yerwada Police Stations pune)

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस शिपाई अनिल शिंदे व अमजद शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे आगाखान ब्रिज जवळ कल्याणीनगर येथे एका रिक्षातून चोरी केलेली चेम्बर्सची झाकणे कोठेतरी घेवून जाणार आहेत.


असे समजल्याने लागलीच तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस नाईक अमजद शेख, अनिल शिंदे, दत्ता शिंदे, गणेश वाघ, किरण घुटे, वर्षा सावंत यांनी २ पुरूष व १ महिलेला पळून जात असताना पकडले.

१) निलेश विलास पवार वय २२ रा स नं १२ उर्दू शाळेजवळ लक्ष्मीनगर येरवडा , २) सुरेश अनिल पाटोळे वय ३१, ३) रोमा सुनिल पवार वय ३५, असे आहेत. त्यांच्याकडे २ लोखंडी चेम्बर्सची झाकणे मिळून आली असून त्यांनी ती कल्याणीनगर भागातून चोरी केली असल्याचे कबूल केल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडे पोलीस कस्टडीदरम्यान अधिक तपास करता त्यांनी कल्याणीनगर भागात एकूण ६ लोखंडी चेम्बर्सची झाकणे चोरल्याचे कबूल केले आहे.

गुन्हयातील चोरीस गेलेली ३६ हजार किंमतीची एकूण ६ लोखंडी चेम्बर्सची झाकणे व चोरी करण्यासाठी वापरलेली ५० हजार रुपये किंमतीची एक रिक्षा असा एकूण ८६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ-४ पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनुस शेख,विजयसिंह चौहान, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी

रविंद्र आळेकर, समीर करपे,अमजद शेख, अनिल शिंदे, प्रदिप सुर्वे,गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, गणेश वाघ, तुषार खराडे, किरण घुटे, राहुल परदेशी, अजित वाघुले, स्वप्नील मराठे,गणेश शिंदे, वर्षा सावंत यांनी केलेली आहे.

Advertisement
Share Now