वाहन चोरांकडून २३ वाहने जप्त : ३ जणांना अटक,
वानवडी पोलीसांनी केला गुन्हा दाखल.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : वाहने चोरुन मौजमजा करणाऱ्या चोरांना वानवडी पोलीस ठाणेकडून अटक करण्यात आली आहे.
वाहन चोरी करणारे ३ आरोपी व २ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेवून त्यांचेकडुन एकुण ९ लाख ६० हजार रुपयांचे २३ वाहने जप्त केले आहे.
भारत बंद बंदोबस्ताच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पेट्रोलिंग करीत असताना शहरात वारंवार घडत असलेल्या,
वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करुन गुन्हेगारांना अटक करणेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहन चोरीचे हॉट स्पॉट तयार करुन सदर ठिकाणी सापळे लावणेबाबत दिलेल्या सुचना,
व आदेशान्वये वानवडी पोलीस सुदर्शन बोरावके व अंमलदार शिरिष गोसावी हे वाहन चोरीबाबत वानवडी बाजार भागांतील वाहन चोरी हॉट स्पॉट परिसरांत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना,
बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की काही तरुण पुणे
शहर परिसरांतून वाहन चोरी करुन ती वाहने पुण्याचे बाहेरील जिल्हयांत त्याची विक्रीकामी नेणार आहे.
सदर भागांत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. गौस मिरासाहब शेख, वय १९ वर्षे,धंदा-मजुरी रा. मूळ-बाराळी एस.बी. आय बॅकेचे शाखेजवळ,ता.मुखेड नांदेड,
रशिद मेहबुब शेख, वय २० वर्षे,धंदा-मजुरी रा.मूळ-बाराळी एस.बी. आय बॅकेचे शाखे जवळ,ता.मुखेड नांदेड, शाहरुख पाशामियाँ शेख,
वय २१ वर्षै, धंदा-आचारी रा.मूळ-बाराळी एस.बी.आय बँकेचे शाखे जवळ, ता. मुखेड नांदेड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.