कुख्यात गुंड माधव वाघाटे अंत्ययात्रेची रॅली प्रकरणी २ पोलीस निरीक्षकांची उचल बांगडी.!

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे व राजेंद्रकुमार कदम यांची बदली.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कुख्यात गुंड माधव वाघाटे याची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्याच्या अंत्ययात्रेला शेकडो दुचाकी वाहनाने रॅली काढून एका प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्या समर्थकांनी केला होता.

वाघाटे याच्या अंत्ययात्रे दरम्यान काढलेल्या रॅलीचे विडिओ सोशल मिडियावर व्हायला झाले होते. पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता.

त्याची दखल घेत सहकारनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. रॅलीचे प्रकरण चांगलीच भोवली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि निरीक्षक (गुन्हे) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत बदली केली आहे तर राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत बदली केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांची सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

Advertisement
Share Now