पुणे शहरातील २ कुंटणखाने लवकरच सीलबंद होणार,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

पुणे शहरातील बुधवार पेठ व कोरेगाव पार्क येथील कुंटणखाने बंदचा प्रस्ताव.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

स्विकारल्यापासून पुण्यामध्ये चालत असलेल्या अवैध धंदे यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे धोरण स्विकारले आहे.

व तसे आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिलेले आहेत.

त्याच अनुषंगाने पुणे शहरामध्ये मुलींकडून वेश्याव्यवसाय चालत असणा-या ठिकाणांची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी छापे टाकून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात रेसीडंन्सी लॉज मधील बी/२ ३३/बी लेन नंबर सी नॉर्थमेन रोड कोरेगाव पार्क ,

Advertisement

व फरासखाना पोलीस ठाण्यात घर नं. १०४८ माहामुनीवाडा क्रांती हॉटेल चौक, बुधवार पेठ, पुणे याठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी छापे टाकून गुन्हे दाखल केले होते.

धाड टाकलेल्या ठिकाणी पुन्हा वेश्याव्यवसाय सुरू होऊ नये म्हणून शहरातील कोरेगाव पार्क पोलीस ठाणे व फरासखाना पोलीस ठाणे यांचे कडून सदर कुंटणखाने सील बंद करण्याबाबतचे प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आले होते.

पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलम १९५६ च्या तरतूदींची अंमलबजावणी करण्यासाठी २ कुंटणखाने प्रस्तावानुसार सिल बंद करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

Advertisement

ते आता लवकरच सिलबंद केले जाईल असे पोलीस आयुक्त कार्यालय मार्फत कळविण्यात आले आहे.

Advertisement
Share Now