इंफाळ
मणिपूरच्या काकचिंग जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी बिहारमधील दोन स्थलांतरित कामगारांची काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकचिंग-वाबगाई रोडवरील केरक येथील पंचायत कार्यालयाजवळ सायंकाळी 5.20 च्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेमागील लोकांची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुनालाल कुमार (18) आणि दशरथ कुमार (17) अशी मृतांची नावे आहेत, ते बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील राजवाही गावचे रहिवासी आहेत. ते बांधकाम कामगार होते आणि मेईटी-बहुल काकचिंग जिल्ह्यात भाड्याच्या घरात राहत होते.