Homeताज्या बातम्यामुरलीधर मोहोळ यांना मौलाना शाहरूख अजीज खान यांचे थेट आवाहन

मुरलीधर मोहोळ यांना मौलाना शाहरूख अजीज खान यांचे थेट आवाहन

कस्बा विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार हेमंत रासने हे विजयी झाल्यानंतर  मुरली अण्णा मोहोळ यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हिंदुत्वाचा नारा आणि फक्त हिंदुत्वाच्या जयजयकाराचे गाणे होते.

https://www.facebook.com/share/r/1896bqp4Az/

त्या व्हिडिओवर मौलाना शाहरूख अजीज खान यांनी प्रतिक्रिया दिली आणि म्हणाले, “हे आपल्याला शोभत नाही.

आपण जनतेचे हित साधण्यासाठी मंत्री झाले आहात, जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे. जर आपण जातिवादाला प्रोत्साहन देत असाल, तर ते चुकीचं ठरेल. तूम्ही सगळ्या समाजासाठी विकासाची दिशा ठरवली पाहिजे आणि सर्व समाजाला एकत्र घेऊनच काम करायला हवं.”

फेसबुकवर काही लोकांनी मौलाना शाहरूख अजीज खान यांचे कमेंट कौतुकाने स्वीकारले, तर काही लोकांचा विचार असा होता की मुस्लिम समाज भाजपच्या सोबत नाही.

यावर मौलाना शाहरूख अजीज खान यांनी स्पष्टपणे सांगितलं, “तुम्ही मला संधी द्या, मी मुस्लिम समाजाला भाजपच्या सोबत जोडून देतो. पण यासाठी तुम्हाला जातीवादाची भूमिका बदलावी लागेल.

तुम्हाला विकासाच्या झेंडा हाती घेत, संविधानाची रक्षा करत आणि सगळ्या समाजाला एकत्र घेऊनच पुढे जावे लागेल.”

मौलाना शाहरूख अजीज खान यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “जर मी मुस्लिम समाजाला भाजपच्या सोबत जोडण्यात यशस्वी झालो नाही, तर माझं नाव मौलाना शाहरूख नाही.”

मौलाना शाहरूख अजीज खान यांचे हे आवाहन एकता आणि समरसतेचा संदेश देत आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याद्वारे सर्व समाजाने विकासाच्या मार्गावर एकत्रितपणे चालण्याची गरज व्यक्त केली आहे, ज्यामुळे जातियवादाच्या तशा भूमिका बंद करणे आवश्यक ठरते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिल्लीतील ट्रिपल मर्डर शॉकरमध्ये पुरुष, पत्नी, मुलगी घरात मृतावस्थेत आढळून आली

0
<!-- -->राजेश (53), कोमल (47) आणि त्यांची 23 वर्षीय मुलगी कविता अशी मृतांची नावे आहेत.दक्षिण दिल्लीतील नेब सराई येथे आज सकाळी एक व्यक्ती, त्याची...

नवीन मल्याळम ओटीटी रिलीज: बोगनविले, हर, सीक्रेट, किष्किंधा कांडम आणि बरेच काही

0
मल्याळम सिनेमा त्याच्या वैविध्यपूर्ण कथाकथनाने आणि आकर्षक कथनांनी प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. 2024 मध्ये, नवीन चित्रपट आणि वेब सिरीज यांचे मिश्रण स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध करून...

error: Content is protected !!