शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही, थेट आघाडीला चेतावणी – महादेव बाबर
पुणे : पुण्याच्या हडपसर विधानसभेत महाविकास आघाडी कडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आल्याने आघाडी मध्ये फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याच मतदार संघात ठाकरे गटाकडून महादेव बाबरही इच्छुक होते. सदरील जागा हडपसर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्याची त्यांनी मागणीही केली होती. मात्र तो शरद पवार गटाकडे गेल्याने बाबर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही. तसेच आघाडी बरोबरही राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आता याच मतदार संघातून अपक्ष उमेदवारीचा अर्ज गंगाधर विठ्ठल बधे यांनी दाखल केला असून त्यांनी आता महाविकास आघाडी व महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे बधे यांना संपूर्ण माळी समाजाबरोबर मुस्लिम संघटना व इतर संघटनांनी देखील त्यांचे स्वागत केले आहे. त्याच बरोबर त्यांना आपला जाहीर पाठिंबा देत निवडून आणण्याची जबाबदरी देखील घेतली आहे हडपसर विधानसभा मतदार संघातील एक यशस्वी उद्योजक, समाजसेवक तसेच प्रभावी व्यक्तिमत्व,
हवेली तालुका पंचायत समिती मा. सदस्य, ज्यांना हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये आणि संपर्ण पुणे जिल्ह्यात ओळखले जाणारे असे श्री. गंगाधर (आण्णा) विठ्ठल बधे यांना हडपसर, सय्यद नगर, कोंढवा याठिकाणाहून अनेक मान्यवरांनी तसेच सायबा ग्रुपचे पदाधिकारी ओबेद भाई शाह, हाजी नदीम भाई, हाजी मुज्जू भाई, हाजी साबीर भाई,
हाजी मुझम्मील भाई, सादीक भाई, युनुस भाई, तल्हा भाई, समीर भाई यांनी पाठिंबा दिला असून अण्णांचे स्वागत केले आहे. पुणे जिल्ह्यातील २१ जागांवर शिवसेनेनं एकही उमेदवार दिलेला नसल्याने अनेक नेते पक्षावर नाराज आहेत.शिवसेनेकडून अपक्ष उमेदवाराला जिंकवण्याची तयारी झाली आहे असेही माजी आमदार महादेव बाबर म्हणाले.