माजी आमदार महादेव बाबर यांच्या पाठिंब्याने हडपसर मतदारसंघात चुरशीची लढाई.
POLICE NEWS 24 प्रतिनिधी.
हडपसर मतदारसंघात काहींना उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने, चेतन तुपे व प्रशांत जगताप यांच्यात घमासान होणार होती. परंतु त्यात हडपसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हे रिंगणात आल्याने आता चांगल्या चांगल्यांची बत्ती गुल होणार आहे.
गंगाधर बधे हे लँड लोड म्हणून ओळखले जात असून, त्यांचा हडपसर, रामटेकडी, कोंढवा मध्ये चांगला दांडगा जनसंपर्क आहे. त्यात विषेश म्हणजे त्यांना माळी समाजाचा, मुस्लिम समाजाचा, व इतर समाजांचा चांगला पाठिंबा आहे.
त्यात माजी आमदार महादेव बाबर यांनी गंगाधर बधे यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.
महादेव बाबर हे “जुने चावल ” म्हणून ओळखले जात असले तरी राजकारण त्यांची चांगलीच पकड आहे. बाबर यांचे कार्यकर्ते गंगाधर बधे यांच्यासाठी रस्त्यावर येऊन काम करणार आहेत. गंगाधर बधे रिंगणात आल्याने तुपे व प्रशांत जगताप यांची नक्कीच डोकेदुखी वाढणार आहे यात काही शंकाच नाही.