गंगाधर बधे यांनी परिसरात केली धमाल आता होणार कमाल.
साईबा ग्रुप व इतर संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आज हडपसर विधानसभेतील अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या रोड शो ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ठिकठिकाणी होणारा फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतशबाजी आणि उमेदवाराच्या नावाच्या घोषणा देत रोड शो चे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. अपक्ष उमेदवार गंगाधर अण्णा बधे यांच्या प्रचारार्थ आयोजित या रोड शोमुळे उमेदवारासह कार्यकर्त्यांचा उत्साह गगनात दिसून आला.
भाजी मंडई, संतोषनगर परिसर, अंजनीनगर, जैन मंदिर परिसर, कात्रज गावठाण, वरखडेनगर, अरुणोदय सोसायटी,शिवशंभू नगर, कात्रज भैरवनाथ मंदिर, शेलार मळा, महादेवनगर, बळकवडे नगर, विद्यानगर अशा मार्गावरून हा रोड शो झाला.
अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी नागरिकांना अभिवादन केले तर कार्यकर्त्यांनी एअर कंडिशनला मतदान करण्याचे आवाहन केले. गंगाधर बधे व सहकाऱ्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रॅलीला भव्य रूप निर्माण झाले होते.
कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या नावाच्या घोषणा देत रोड शोचा मार्ग दणाणून सोडला होता. सकाळी ९ वाजता सुरू झालेला हा रोड शो दुपारी २ समाप्त झाला. महाराष्ट्राच्या विकासाचं एअर कंडिशनर क्रमांक १६ पसंतीही एक असे मतदारांना सांगत कार्यकर्त्यांनी रोड शोच्या मार्गातील संपूर्ण परिसर पिंजून काढला.सोबत साईबा ग्रुप व इतर संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.