मुंबई :
मुंबईतील गोराई समुद्रकिनाऱ्यावर एका प्लास्टिकच्या पिशवीत सात तुकड्यांमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.
प्लास्टिकच्या पिशवीतून सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.